सिडकोविरोधात अजून चार याचिका दाखल; 30 मे रोजी सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिडकोने नवी मुंबईतील भल्यामोठय़ा होर्डिंग्जवर सुरू केलेल्या कारवाईविरोधात अजून चार याचिका दाखल झाल्या आहेत. सिडकोची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.

अॅड. शिवम दुबे यांच्यामार्फत दाखल झालेल्या या याचिकांवर 30 मे 2024 रोजी न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सिडकोने या याचिकाकर्त्यांच्या एकूण अकरा होर्डिंग्जला नोटीस पाठवली आहे. होर्डिंग्ज काढा, अन्यथा आम्ही हे होर्डिंग्ज काढू व त्याचा खर्च पंपनीकडून वसूल करू, असा इशारा सिडकोने दिला आहे. ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.