
सोलापुरातील माढा सबजेल मधून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपीचे पलायन केले आहे. सदरची घटना आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून या बाबत माढा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आज सकाळी आरोपी पैकी अकबर पवार याला फिट येत असल्याचे ड्युटी वरील अंमलदार यांना सांगितले. त्याला उपचारासाठी बाहेर काढले जात असतानाच पोलिसांना धक्का मारून अकबर पवार याच्यासह आणखी तीन गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी सबजेल मधून पलायन केले.
सिद्धेश्वर शिवाजी केचे याच्यावर बनावट चलनी नोटा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर अकबर सिद्धप्पा पवार वर बेकायदेशीर हत्यार बाळगणे, आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर वर खुनाचा गुन्हा तर तानाजी लोकरेवर पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी माढा सब जेल मधून पळून गेले आहेत.
























































