
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांची हत्या करणाऱ्या चार दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. झाहीद हुसेन सागर, नावेद, ओसामा बिन जावेद, हरुण वाणी अशी त्या चौघांची नावे असून गुप्तचर यंत्रणांनी त्या चौघांचे फोटो जारी केले आहेत. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

9 एप्रिलला जम्मू कश्मीरमधील किश्तवाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शर्मा यांच्यासह त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. शर्मा यांची हत्या करणाऱ्या चौघांपैकी तिघे जण हे स्थानिक तरुण आहेत. ओसामा बिन जावेद हा किश्तवाडमधील माडवाचा तर हरूण वाणी हा डोडा भागातील रहिवासी आहे. तर नावेद शोपियनमध्ये पोलीस दलात कामाला होता. तो गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत सामिल झाला होता.

























































