
सामना ऑनलाईन । हैदराबाद
हैदराबादमध्ये एका बार डान्सरची छेड काढल्याप्रकरणी चार महिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच या महिलांनी पीडीतेला रस्त्यावरच निर्वस्त्र करून तिला मारहाण केली. हैदराबादच्या बेगमपेट भागातील ही घटना असून या प्रकरणी एका पुरुषालाही अटक करण्यात आली आहे.
काही महिला डान्सबारमध्ये आल्या तेव्हापासून त्यांनी एका बार डान्सरला त्रास देण्यास सुरूवात केली. चारही महिला या पीडीतेसोबत काम करत होत्या. आरोपी महिलांनी तरुणीला रस्त्यावरच मारहाण केली आणि तिला निर्वस्त्र केले. त्यांच्यासोबत सय्यद नावाचा पुरुषही होता.
पीडित तरुणी पूर्वी चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. आर्थिक स्थिती खालावल्याने तिने नाईलाजाने हा पेशा स्विकारला. बार डान्सरने जेव्हा पोलिसांकडे जेव्हा तक्रार केली तेव्हा पोलिसांनीही तक्रार स्विकार करताना का कू करत होते. या प्रकरणी पाचही जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
























































