२० वर्षांनंतर फ्रान्स चॅम्पियन

31

सामना ऑनलाईन । मॉस्को

‘हॉट फेव्हरीट’ फ्रान्सने फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ‘जाएंट किलर’ क्रोएशियाला ४-२ गोल फरकाने धूळ चारून जगज्जेतेपदाच्या झळाळत्या सोनेरी करंडकावर रुबाबात आपले नाव कोरले. १९९८ मध्ये फिफा वर्ल्डकपमध्ये प्रथम चॅम्पियन ठरलेल्या फ्रान्सने तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा त्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा पराक्रम केला. वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच फायनल गाठणाऱ्या क्रोएशियाला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऍण्टोईन ग्रिझमनला सामनावीराचा बहुमान मिळाला.

वर्ल्ड कपमधील विजयीवीर
– गोल्डन बुट – हॅरी केन (सहा गोल)
– सिल्व्हर बुट – ऍण्टोइन ग्रिझमन (चार गोल)
– ब्राँझ बुट – रोमेलु लुकाकू (चार गोल)
– गोल्डन बॉल – लुका मॉड्रिच
– सिल्व्हर बॉल – एडन हझार्ड
– ब्राँझ बॉल – ऍण्टोइन ग्रिझमन
– गोल्डन ग्लोव (गोलकीपर) – थिबॉट कोर्टोइस
– सर्वोत्तम युवा खेळाडू -किलीयन एम्बापे (१९ वर्षे)

– पूर्वार्धात २-१ अशा आघाडीवर असलेल्या फ्रान्सने मध्यांतरानंतर क्रोएशियावर जोरदार हल्लाबोल करत ४-१ अशी मुसंडी मारली. पॉल पोगबाने ५९व्या मिनिटाला सेंटर पोजीशनवरून भन्नाट मैदानी गोल केला. त्यानंतर नव्या दमाचा स्ट्रायकर किलियन एम्बापेने ६५व्या मिनिटाला लुकाज हेर्नांडेजच्या पासवर चपळाईने गोल करून फ्रान्सची आघाडी भरभक्कम केली. क्रोएशियाच्या मारियो मांजुकिचने ६९व्या मिनिटाला चेंडू जाळीत पाठवून गोलअंतर २-४ असे कमी केले,

चुकीला माफी नाही!

तमाम फुटबॉलशौकिनांचा भावनिक पाठिंबा असलेल्या क्रोएशियाने सामन्याची आश्वासक सुरुवात केली होती, मात्र लढतीच्या १८ व्या मिनिटाला अघटित घडले. फ्रान्सच्या ऍण्टोईन ग्रिझमनच्या फ्री किकवर आक्रमणाची धुरा काहणाऱ्या मारियो मॅन्जुकीचच्या डोक्याला लागून चेंडू क्रोएशियाच्याच गोलजाळीत किसाकला अन् स्वयंगोल झाला. फायनलसारख्या लढतीत स्वयंगोल म्हणजे चुकीला माफी नाही. झुंजार क्रोएशियाने स्वयंगोल खाल्ल्यानंतर २८व्या मिनिटाला लढतीत पुनरागमन केले. इवान पेरिसीचने फ्री किकवर क्रोएशियासाठी बरोबरीचा गोल डागला, मात्र ३८व्या मिनिटाला ऍण्टोईन ग्रिझमनने क्रोएशियाचा गोलरक्षक डेनिजेल सुबासिचला चकवत सहज गोल करून फ्रान्सला २-१ असे आघाडीवर नेले.

आपली प्रतिक्रिया द्या