फ्रान्समधील हल्ल्याचे समर्थन मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्समधील हल्ल्याचे समर्थन केल्याप्रकरणात प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुनव्वर राणा यांनी आपल्याला जेलात टाकले तरी चालेल पण आपण कदापि माघार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मोहम्मद पैंगबर यांच्या कार्टुनवरून निर्माण झालेल्या वादात फ्रान्स धूमसत आहे. एका चेचन अतिरेक्याने मोहम्मद पैंगबराचे कार्टुन दाखवणाऱ्या शिक्षकाचा शिरच्छेद केला. त्यानंतर एका चर्चमध्ये घुसलेल्या अतिरेक्याने महिलेसह दोघांचा गळा चिरला. जगभर या घटनेच्या विरोधात पडसाद उमटत आहेत.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅन्क्रो यांनी इस्लामी कट्टरवाद सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या वादात शायर मुनव्वर राणा यांनीही उडी घेत, ‘हल्ला करणाराच्या जागेवर मी असतो तर तेच केले असते. पुणालाही एवढे विवश करू नये की तो हत्या करण्यासाठी तयार होईल’ असे वादग्रस्त विधान केले.

मुनव्वर राणा यांच्या या विधानावरून धूरळा उडाला. लखनौच्या हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दीपकपुमार पांडेय यांनी द्वेष पसरवणे, शांतता भंग करणे आदी कलमांखाली राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यावर मुनव्वर राणा यांनी गुन्हा दाखल केला तरी आपली भूमिका बदलणार नाही असे स्पष्ट केले.

राणा मुलगी सुमैया हिने सांगितले की, आपले वडील भूमिकेवर ठाम असून  ते जामीनासाठी अर्ज करणार नाहीत. सरकार जेलात टाकणार असेल तर आपण जेलात जाण्यास तयार आहोत. शिरच्छेद हा गुन्हा असेल तर मोहम्मद पैगंबर यांचे कार्टुन बनवणे हा त्यापेक्षाही मोठा अपराध आहे असे त्यांचे मत आहे, असे सुमैया म्हणाली