
सामना ऑनलाईन, एकतेरीनबर्ग
१९९८ सालामध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या फ्रान्सच्या फुटबॉल संघाने गुरुवारी पेरूला १-० अशा फरकाने पराभूत करून रशिया येथे सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आणि बाद फेरीत म्हणजेच अंतिम १६ मध्ये धडक मारली. आता ‘सी’ गटातून दुसऱ्या स्थानासाठी डेन्मार्क व ऑस्ट्रेलियामध्ये चुरस आहे. दोन पराभवांनंतर पेरूचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. किलीयन एमबापे याने ३४ व्या मिनिटाला गोल करून फ्रान्सला पूर्वार्धात १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले, पण फ्रान्सने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर हा सामना खिशात घातला.





























































