
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या चौघांना मध्य प्रादेशिक सायबर सेलने अटक केली. मोहम्मद जावेद अन्सारी, रेहान कौशर अलम, मोहम्मद अरफत बाबू शेख आणि आसिफ शेख अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांच्या अटकेने तीन गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार हे कुर्ला येथे राहत असून ते व्यावसायिक आहेत. जून महिन्यात त्यांना एका महिलेचा मेसेज आला होता. त्यात तिने त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन केला. ती ट्रेडिंग अकाऊंटमध्ये असल्याचे भासवले. शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे त्यांना सांगितले. त्यानंतर तिने त्यांना एका खासगी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. ठगाने त्यांना एक लिंक पाठवून माहिती अपलोड करण्यास सांगितले. लिंकच्या माध्यमातून त्याने 13 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रविकिरण डोरले, उपनिरीक्षक पूनम जाधव, पोळ, पाटील, कोळी आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मशीद बंदर येथे छापा टाकून मोहम्मद जावेद, रेहान काwशर, मोहम्मद अरफत, आसिफ खानला ताब्यात घेतले. घटनास्थळाहून पोलिसांनी विविध बँकांमध्ये लागणारे दस्तावेज जप्त केले आहेत. मोहम्मद जावेद हा इतर जणांच्या मदतीने त्याने बनावट नावाने पंपन्या सुरू केल्या होत्या. त्या पंपन्यांच्या नावावर त्याने बँक खाती उघडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मोहम्मद जावेद हा एजंट असून तो ठगांना विविध बँकेत खाती उघडून देण्यास मदत करत होता. त्यांना ठराविक रक्कम ही कमिशन म्हणून मिळत होती. या टोळीविरोधात मुंबई, गुजरात आणि तेलंगणा सायबर पोलिसात गुन्हे नोंद आहेत.