Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’10 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, August 10, 2023)
अनोळखी व्यक्तिंवर विश्वास टाकू नका. कोणालाही चिडवून हसू नका. पैशाचा काटकसरीने वापर करा. आरोग्याची काळजी घ्या. हाताखालच्या लोकांकडून कामे करून घेताना कसरत करावी लागेल. विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. प्रवासात सामानाची योग्य ती काळजी घ्या.
शुभरंग : मोती

वृषभ (TAURUS – Thursday, August 10, 2023)
नातलग, मित्रमंडळींसाठी वेळ काढाल. वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवा. आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. इतरांनाही सकारात्मक करण्यासाठी पुढाकार घ्याल. कलाक्षेत्रात प्रगती करण्याचा काळ आहे.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Thursday, August 10, 2023)
चिंतेऐवजी चिंतन करा. प्रकृती उत्तम राहण्यासाठी पहाटे मोकळ्या हवेत फिरयला जाल. आहार-विहाराचे नियम पाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. घरात अनावश्यक वाद घालत बसू नका. घरातील थोरामोठ्यांची मदत घ्यावी लागेल. एकमेकांच्या मतांना प्राधान्य द्या. सैरावैरा धावणाऱ्या मनाला नियंत्रणात ठेवा.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Thursday, August 10, 2023)
गाईला हिरवा चारा खाऊ घाला. मन उल्हसित राहिल. पैशाची अडचण येण्याची समस्या आहे. तुमचे म्हणणे इतरांना पटवून द्यावे लागेल. कार्यालयीन कामात सहकाऱ्यांची मदत घ्या. सहकाऱ्यांशी अचूक संवाद साधा. जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या जेवणाची प्रिय व्यक्तिकडून मेजवानी मिळेल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Thursday, August 10, 2023)
नवीन योजना सुचतील. कायद्याचे पालन कराल. आवडत्या पदार्थाच अतिरेक पोटाच्या आरोग्यासाठी टाळावा लागेल. प्रवासात नियोजन महत्त्वाचे ठरेल. घरातील मोठ्या व्यक्तिला विचारल्याशिवाय कोणतेही धाडस करायला जाऊ नका. योग्य निर्णय योग्य वेळी घ्या. कोणवरही जास्त विश्वास ठेवू नका. आशावादी राहाल.

शुभरंग :  राखाडी

कन्या (VIRGO -Thursday, August 10, 2023)
बोलताना मधुरावाणीचा वापर करा. प्रतिष्ठित व्यक्तिंची ओळख होईल. कष्टाचे पैसे गुंतवताना विचार करा. धार्मिक कार्यासाठी दानधर्म करा. गरजूंना मदत करा. सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा. जोडीदासोबत समजूतदारपणे वागाल. कठीण परिस्थितीत निराश होऊ नका.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Thursday, August 10, 2023)
भूतकाळाचा विचार करू नका. आराध्यदेवतेचा दर्शन घ्या. नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. योजलेली कामे पूर्ण कराल. कामाचे प्रयत्न वाढतील. घरातील समस्या सुटतील. वडीलधाऱ्या मंडळींकडे लक्ष द्या. कोणालाही आश्वासने देताना विचार करा. स्वत:च्या स्वभावाचे नीट निरीक्षण करा.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, August 10, 2023)
प्रयत्न करा यश मिळणारच. सामंजस्याने परिस्थिती हाताळा. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. शुद्ध , सात्त्विक आणि चौरस आहार घ्या. घराच्या सुशोभिकरणाकडे लक्ष द्याल. पैसे सुरक्षित स्थळी ठेवाल. कलाक्षेत्रातील कौशल्या वाढीस लागेल. आवडत्या रंगाचा पोषाख खरेदी करा.
शुभरंग : पिवळा

धनु (SAGITTARIUS – Thursday, August 10, 2023)
तणावरहीत राहण्याचा प्रयत्न कराल. भावना आणि कर्तव्य यांचा मेळ योग्य घालाल. अतिधाडस आणि साहस टाळा. स्वत:चे म्हणणे खरे करण्यापेक्षा शांत राहा. जोडीदारासोबत आज मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ मिळेल. त्याच्या भावनांची कदर कराल. स्वत:जवळील कौशल्याचा वापर करा. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक कामे कराल.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Thursday, August 10, 2023)
घरातील सदस्यांना समजून घ्या. कुणालाही पैसे उधार देऊ नका. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कराल. आवडत्या फुलांचा गजरा केसात माळा. मिळालेला रिकामा वेळ नाटक सिनेमा पाहण्यात घालवाल. अपरिचित व्यक्तिवर विश्वास ठेवू नका. खरेदी करण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Thursday, August 10, 2023)
झोपण्यासाठी चटईचा वापर करा. नवे परिचय लाभदायक ठरतील. अति खाणे टाळा. प्रिय मैत्रिणीला तिला आवडणारी भेटवस्तू द्याल. इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. कोणाला अति मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. अचानक प्रवासाचे योग आहेत. मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Thursday, August 10, 2023)
आपले मत कमी शब्दांत मांडाल. मेहनतीला यश मिळेल. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला सांगाल. मित्रमंडळींकडून मदतीचा हात मिळेल. मनोरंजन करण्याच्या नादात नियमांचे उल्लंघन करू नका. मालमत्ताविषयक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
शुभरंग : सोनेरी