Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’11 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, August 11, 2023)
ज्येष्ठ व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्या. मौल्यवान वस्तू जपून ठेवा. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. मंजिरी किंवा सब्जामिश्रीत पाणी प्या. पचनाचे विकार होऊ नयेत याकरिता हलका आहार घ्या. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : निळा

वृषभ (TAURUS – Friday, August 11, 2023)
आवडता पदार्थ खायला मिळेल. मित्रमंडळींसोबत आजची सायंकाळ घालवाल. सकाळी हिरव्यागार गवतावरून चाला. रात्री झोपण्यापूर्वी आराध्य देवतेला नमस्कार करून झोपा.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Friday, August 11, 2023)
नवीन संकल्पना राबवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. घरात नवीन शोभेची वस्तू विकत घ्याल. प्रिय व्यक्तिकडून आवडती वस्तू मिळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभरंग : पिवळा

कर्क (CANCER – Friday, August 11, 2023)
आज दिवसाची सुरुवात योगासनं, ध्यानधारणेने करा. मानसिक तणाव दूर होईल. गरजू व्यक्तिला अन्नदान करा. आज स्वत:साठी वेळ काढाल. प्रलंबित कामे पूर्ण कराल. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून प्रिय व्यक्तिसाठी वेळ काढाल.
शुभरंग : किरमिजी

सिंह (LEO – Friday, August 11, 2023)
करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात आजचा दिवस घालवाल. गरिबांना काळे ब्लँकेट दान करा. भविष्यात केलेल्या गुंतवणुकीचा वर्तमानात फायदा घ्याल. प्रवास जपून करा. आर्थिक फायद्याकरिता नव्या योजनांचा अवलंब कराल.
शुभरंग: हिरवा

कन्या (VIRGO – Friday, August 11, 2023)
आराध्य देवतेची उपासना करा. इतरांमधले दोष बघत बसू नका. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा फायदा घ्याल. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नव्या तंत्राचा वापर कराल. कुठलेही काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Friday, August 11, 2023)
कुत्र्याला खाऊ घाला. धार्मिक कार्यात मन रमवाल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा कराल. इतरांना दिलेली वेळ पाळावी लागेल. स्वत:साठी वेळ काढाल. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जोडीदारासोबत सायंकाळी बागेत फिरायला जाल.
शुभरंग : मोती

वृश्चिक ( SCORPIO – Friday, August 11, 2023)
नवे नातेसंबंध जोडाल. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. सहलीला जाण्याचा योग आहे. आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. भुकेल्याला कढी-भात खाऊ घाला. हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Friday, August 11, 2023)
केळीचे झाड अंगणात लावून त्याची पूजा करा. ज्येष्ठ मंडळींसाठी आज वेळ काढाल. एखादी चांगली बातमी सायंकाळपर्यंत कानी येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आज भरपूर वेळ मिळेल. गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN – Friday, August 11, 2023)
सूर्याचे स्तोत्र वाचा. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी सायंकाळची वेळ चांगली आहे. वेळीच मदत केल्याने घरातील मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद लाभतील. आज अत्यंत काळजीपूर्वक वागण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छा प्रिय व्यक्ति पूर्ण करेल.
शुभरंग : गुलाबी

कुंभ (AQUARIUS – Friday, August 11, 2023)
विश्रांतीकरिता वेळ काढाल. ताणतणावावर मात कराल. कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी मदत होईल. आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न कराल. आज मानसिक शांततेचा अनुभव येईल. नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळवाल.
शुभरंग : खाकी

मीन (PISCES – Friday, August 11, 2023)
तांदूळ, साखर, पीठ, मैदा किंवा दूध यापैकी कोणत्याही एका पदार्थांचे दान करा. व्यायामासाठी वेळ काढाल. नवीन प्रकल्प हाती येण्याची शक्यता आहे. नाते सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागलीत. नातेवाईकांकडून नवे प्रस्ताव ऐकायला मिळतील. लोकांऐवजी स्वत:ला वेळ द्यावासा वाटेल.
शुभरंग : चॉकलेटी