Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’12 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, August 12, 2023)
ब्राह्मणांना जेवू घाला. भूतकाळातील व्यक्ती संपर्क साधेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यांवर प्रभाव राहिल. बडबड करून वेळ वाया घालवू नका. शांत राहणे कधीही चांगले असते. आजी-आजोबांना प्रेमाची वागणूक द्याल. जोडीदार आज तुमचे कुठलेही म्हणणे मनापासून ऐकण्याची शक्यता आहे.
शुभरंग : आकाशी

वृषभ (TAURUS – Saturday, August 12, 2023)
पिगी बँकेमध्ये नाणी जतन करा. स्वप्न सत्यात उतरल्याची प्रचिती येईल. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. धन लाभाची शक्यता आहे. कार्यालयातील वरिष्ठांमुळे मनोधैर्य उंचावेल. आवडत्या वस्तूची खरेदी कराल. लोकं तुमचे म्हणणे विचारात घेतील. गरज वाटेल तेव्हा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Saturday, August 12, 2023)
धनलाभाची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग कराल. प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. सहकारी तुम्हाला कार्यालयात मदत करतील. निसर्गरम्य ठिकाण रमाल. आहाराचे पथ्य-पाणी जपा. नाती जपा. पारिजातकाच्या झाडाला पाणी घाला.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Saturday, August 12, 2023)
पांढऱ्या सशाला खाऊ घाला. प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल. आज तुमचा मूड चांगला असेल. नव्या संकल्पना फलद्रुप होतील. जोडीदारासोबत आजचा सुंदर दिवस व्यतीत कराल. कोणाकडूनही उधार मागू नका. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल. आवडता पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळेल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.
शुभरंग : मोरपिसी

सिंह (LEO – Saturday, August 12, 2023)
आनंदाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. जवळच्या व्यक्तीसोबत वादविवाद घालू नका. आजूबाजूला गुलाबी वातवरणाचा अनुभव घ्याल. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. प्रिय व्यक्तिची भेट होईल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा. कुटुंबातील वादग्रस्त मुद्दे एकमेकांच्या संमतीने सोडवा.
शुभरंग: निळा

कन्या (VIRGO – Saturday, August 12, 2023)
दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करा. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानधारणा करा. इतरांवर प्रभाव पडेल. कामामध्ये मोठा फायदा होईल. सायंकाळी आवडत्या बागेत फिरायला जाल. आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. रखडलेली कामे मार्गी लागतील. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. व्यसन टाळा. शिवपिंडीवर जलअभिषेक कराल.
शुभरंग : खाकी

तूळ (TULA- Saturday, August 12, 2023)
गाईला उकडलेले बटाटे हळद घालून खाऊ घाला. दूरच्या नातेवाईकाकडून कानी आलेल्या बातमीमुळे आजचा दिवस उजळून निघेल. टीव्ही किंवा मोबाईलवर सिनेमा पाहण्यात वेळ घालवाल. काचेच्या बाटलीतले पाणी प्या. आर्थिक बाजू मजबूत होईल. प्रिय व्यक्तिने दुस्वास केला, तरी तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागा.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक (SCORPIO – Saturday, August 12, 2023)
गरजूंना चामड्याचे बूट दान करा. जोडीदारासोबत चित्रपट पाहायला जाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस उत्साहात घालवाल. नवीन पुस्तकाची खरेदी कराल. इच्छा नसतानाही बाहेर फिरायला जाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील वातावरण उत्साही असेल. नवीन पुस्तकाची खरेदी करून वाचनात वेळ घालवाल.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Saturday, August 12, 2023)
कोणाविषयीही मनामध्ये वाईट विचार ठेवू नका. चिंता नाहिशी होईल. गुंतवणूक करताना नीट विचार करा. धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर जाईल. नको त्या वेळी झोपून राहू नका. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. कोणालाही अपशब्द बोलू नका. महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क कराल.
शुभरंग : चंदेरी

मकर (CAPRICORN – Saturday, August 12, 2023)
प्रकृती सुधारा. चांगले आयुष्य जगण्यासाठी व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न कराल. पैसे कमवण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आर्श्चयाचा सुखद धक्का बसेल. घराकामात जोडीदाराचे सहकार्य घ्याल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. दिवस आळसात जाण्याची शक्यता आहे. मोबाईल बघण्यात जास्त वेळ घालवू नका.
शुभरंग : गुलाबी

कुंभ (AQUARIUS – Saturday, August 12, 2023)
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घ्याल. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. घरगुती कामं कंटाळवाणी होतील. स्वत:साठी वेळ काढा. आज बराच वेळ रिकामा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सरप्राइझ मिळेल. प्रिय व्यक्ती आज तुमच्यावर रागावू शकते. स्वयंपाकघराच्या खिडकीत कोरफडीचे झाड लावा.
शुभरंग : चॉकलेटी

मीन (PISCES – Saturday, August 12, 2023)
भीती, चिंता, राग, लोभ, शंका असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कौशल्यामुळे नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रमात स्वत:ला गुंतवाल. रिकामा वेळ मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात घालवाल. तुमच्या कामाला आज नव्याने दाद मिळेल. हितचिंतकाकडून प्रोत्साहन मिळेल. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : राखाडी