Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’17 मे’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Thursday, May 18, 2023)
आज महत्त्वाचे निर्णय घ्याल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचण भासणार नाही. चांगली बातमी कानी येईल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुळशीला सकाळी पाणी घाला. गणपतीला 21 दुर्वा वाहा.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Thursday, May 18, 2023)
खेळात सहभागी व्हाल. गाईला गूळ खाऊ घाला. नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. लोकं तुमचे अभिनंदन करतील. पैसे जपून वापरा. पिंपळाच्या झाडाजवळ गुरुवारी दिवा लावा.
शुभरंग : पोपटी

मिथुन (GEMINI – Thursday, May 18, 2023)
जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लान कराल. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल. सायंकाळी काहीतरी खास प्लान आखाल. वेळेचा दुरुपयोग करू नका. अति विचार करू नका. आजचा दिवस उत्तम जाईल. मनाजोगी खरेदी करता येईल. आवडती व्यक्ती अनपेक्षित घरी येईल.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Thursday, May 18, 2023)
इष्टदेवतेचे दर्शन घ्या. आरोग्याची काळजी घ्या. पैसे जपून वापरा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. स्वत:साठी वेळ काढाल. सौंदर्याची काळजी घ्या. नवीन गृहशोभेची वस्तू घरी आणाल. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळेल. श्री महालक्ष्मीदेवीला शेवंतीची वेणी घाला.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Thursday, May 18, 2023)
प्रियकर, प्रेयसीला पांढऱ्या रंगाचे फूल भेट द्या. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्याल. जास्तीच्या कामाचे छान मानधन मिळेल. गोड बातमी कानी येण्याची शक्यता आहे. व्यस्त दिनचर्येमुळे कार्यालयात उशिरा पोहचण्याची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : काळा

कन्या (VIRGO -Thursday, May 18, 2023)
हिरवे दगड फ्लॉवर पॉटमध्ये ठेवा. शारीरिक आजारातून लवकर बरे व्हाल. घरातील साफसफाई करण्यासाठी वेळ काढाल. विचार आणि आवडीनिवडी मिळत्याजुळत्या असणाऱ्या व्यक्तिंची मदत घ्याल. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. रिकामा वेळ घरची साफसफाई करण्यात घालवाल. हिरव्या रंगाच्या बाटल्यांमध्ये झाड लावा.
शुभरंग : तांबडा

तूळ (LIBRA- Thursday, May 18, 2023)
आरोग्याची काळजी घ्याल. सोन्याची अंगठी बोटात घाला. नात्यांना मजबुती येईल. इतरांचे म्हणणे ऐकून घ्याल. भावंडांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. मैत्रीत प्रेम वाढेल. सायंकाळी बागेत फिरायला जा. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. फुलदाणी पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले ठेवा.
शुभरंग : नारिंगी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, May 18, 2023)
काचेच्या बाटलीतील पाणी प्या. सकारात्मक विचार करा. घरातील आर्थिक स्थिती सुधारेल. सहकारी कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. स्वत:साठी वेळ काढाल. मनाजोगी खरेदी कराल. आजचा दिवस उत्तम आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
शुभरंग : पिवळा

धनु (SAGITTARIUS – Thursday, May 18, 2023)
आहारात बदामाचा समावेश करा. आराम करण्यासाठी वेळ काढाल. मुलांसोबत गोडीगुलाबीने वागावे लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. कार्यालयातून घरी लवकर जाल. जोडीदार तुमच्या मनाप्रमाणे वागेल. आरोग्याची काळजी घ्या. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : गुलाबी

मकर (CAPRICORN – Thursday, May 18, 2023)
प्रिय व्यक्तिला लाल रंगाचे कपडे भेट द्या. स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवा. काहीही न करता बसून राहण्याची सवय सोडून द्या. घरातील साफसफाईसाठी वेळ काढावा लागेल. आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुंना भेटायला जाल. जोडीदाराची धाडसी बाजू लक्षात येईल. कोणालाही उगाचच वचन देऊ नका.
शुभरंग : हिरवा

कुंभ (AQUARIUS – Thursday, May 18, 2023)
कुटुंबियांसाठी वेळ काढाल. अचानक कामे वाढू शकतात. घरातील परसात पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे गुलाबाचे झाड लावा. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. आयुष्यातील चढ-उतार योग्य व्यक्तीकडेच शेअर कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
शुभरंग : राखाडी

मीन (PISCES – Thursday, May 18, 2023)
तुमच्यातील लहान मूल जागे होईल. आजचा दिवस खेळीमेळीचा असेल. वडिलांचा सल्ला लक्षात घ्या. कामाच्या क्षेत्रात धन लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या संधी शोधाल.
शुभरंग : नारिंगी