
देशातील ऑक्सिजन तुटवडय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने भक्कम पुढाकार घेतला आहे. पंपनीने खूप कमी वेळेत ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढवली आहे. सध्या पंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना दररोज 700 टनहून ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला जात आहे. रिलायन्सच्या या पुढाकारामुळे दररोज कोरोनाच्या 70 हजार गंभीर रुग्णांना जीवदान मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीमधून सुरुवातीला 100 टन मेडिकल-ग्रेड ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. मात्र सध्या देशभर ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे पंपनीने ऑक्सिजन उत्पादन क्षमता 700 टक्क्यांच्या पुढे नेली आहे. जामनगर रिफायनरीमधून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांबरोबरच दीव-दमण आणि दादरा नगर हवेली या पेंद्रशासित प्रदेशांनाही मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. 183 अंश सेल्सिअस तापमान असणाऱया विशेष टँकर्समधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.

























































