
आपत्कालीन नियत्रंण विभागामार्फत आपदा मित्र या उपक्रमाकरीता 12 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित केले गेले आहे. परळ येथील शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रांत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना काही सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाछी विद्यार्थ्यांना दररोज 150 रुपये वाहतूक खर्च दिला जाणार. तसेच 15 हजार रुपयांचे इमरजन्सी किट दिले जाणार आहे. तसेच पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय विमा विनामूल्य करुन दिला जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी 18 ते 40 वर्षे अशी वयाची अट असणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्यांनाच या प्रशिक्षणात या उपक्रमात सहभागी होता येईल.
हे प्रशिक्षण या महिन्यात चार न 30 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी व 20 फेब्रुवारी या दिवशी सुरू होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 022 -24711916


























































