ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मानसिंगराव शिंदे यांचे निधन

गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मानसिंगराव शिंदे (वय 86) यांचे दीर्घ आजाराने सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, जावई असा परिवार आहे.

स्वातंत्र्यसैनिक शिंदे गेले 28 दिवस हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. या आजारातून ते पूर्ण बरे झाले होते. दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्जही मिळणार होता; परंतु काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.  शासनाच्या वतीने सातारा तहसीलदार कार्यालयाद्वारे पुष्पचक्र अर्पण करून मानसिंगराव शिंदे यांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सातारा जिह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून मानसिंगराव शिंदे व प्राचार्य डॉ. आर. के. शिंदे यांचा सत्कार होणार होता; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या