फ्रेन्च अभिनेत्री ब्रिगिट बार्डोट यांचे निधन, 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. 60च्या दशकातील हॉलिवूड आणि फ्रेंच सुपरस्टार ब्रिजिट बार्डोट यांचे निधन झाले आहे.वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बार्डोट यांना अभिनयाबरोबरच एक गायिका आणि प्राणी हक्क कार्यकर्ती अशी त्यांची ओळख होती.

ब्रिजिट बार्डोट फाउंडेशनचे प्रतिनिधी ब्रुनो जॅकेलिन यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. मीडिया वृत्तानुसार,गेल्या महिन्यात त्यांना आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने हॉलिवूडपासून ते जगभर शोककळा पसरली आहे.