जातीवरून वादात काढला मित्राचा काटा; आरोपीना बेडय़ा

498
प्रातिनिधिक फोटो

तिघा मित्रांची जेवणाची पार्टी रंगली. या पार्टीत जातीचा विषय आला आणि पार्टीचा रंगच बिघडला. जातीचा वाद वाढत गेला आणि एका मित्राने दुसऱया मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारला. गंभीर जखमी अवस्थेतील मित्राला गाडीतून फिरवले आणि मृत झाल्यावर आंबा घाटात फेकून दिले. मात्र तब्बल चार महिन्यांनी त्या मृताच्या अंगाकरील शर्टवर असलेल्या लोगोने त्या मृताच्या मारेकऱयांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

प्रकाश भोवड (रा. देकराई लांजा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रुपेश दयानंद कोत्रे (रा. लांजा शेकरकाडी) आणि सतिश चंद्रकांत पालये (रा. कोंडये, पालयेकाडी) या दोघांना या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यातील सतीश पालये हा सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात 12 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आंबा घाटात सापडलेल्या मृतदेहाबाबत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणेव मुंबई तसेच कर्नाटक, विजापूर येथे शोध घेण्यात आला. मयताची ओळख पटविण्यासाठी एकही पुरावा नसताना आशेचा एकच किरण होता तो म्हणजे मृताच्या अंगावर असलेल्या शर्टवरील राज मुंबई असा लोगो. ‘राज मुंबई’ या टेलरचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर तपास यादी व्हायरल करण्यात आली.

पोलिसांनी रत्नागिरी व आजुबाजुच्या सर्व पोलीस ठाणी, पोलीस पाटील यांची मिटींग घेवून त्यांना शोध घेण्याचे आकाहन केले. 10 जुलैला महत्वाची माहिती समोर आली. मृताच्या अंगावरील असणारा शर्ट इसम प्रकाश भोवड याचा असल्याची माहिती मिळाली. प्रकाश भोवड याच्या नातेकाईकांना बोलावून फोटो दाखविला असता मृताची ओळख पटली. प्रकाश भोवड याला कोणाबरोबर शेवटचे पाहिले गेले याचा शोध घेतला असता त्याचे मित्र रुपेश कोत्रे, सतीश पालये यांच्याबरोबर तो होता अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना लांजातून ताब्यात घेतले. चौकशीत प्रकाश भोवड यांचा खून केल्याची त्यांनी कबुली दिली.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला असून तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार, चौधरी यांची मदत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या