
वसुबारस ः दीपावलीची सुरुवात म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. या दिवशी गाईची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी ः या दिवशी मंगलस्नान करून दिवा लावला जातो. 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी दीपदान केले जाते.
नरक चतुर्दशी ः या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध करून जनतेला भयमुक्त केले. बंदिवासातील सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराचा प्रतीकात्मक वध केला जातो.
लक्ष्मी पूजन ः वैभव, सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक लक्ष्मी आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. संयमपूर्वक धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते, अशी यामागे श्रद्धा आहे.
दीपावली पाडवा ः हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते.
भाऊबीज ः 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवळले आणि आनंद व्यक्त केला.