
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आज भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली. नगर जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर कार्यकारिणी रखडली. त्यातच शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील झालेल्या निवडी वादात सापडल्यामुळे दोन्ही गटांच्या समर्थकांनी आज बावनकुळे यांच्यासमोर घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला. दरम्यान, आज सकाळी झालेल्या रॅलीसाठी जिह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱयांनी दांडी मारली.