गांधीगिरी बेतली असती जीवावर, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या मुलाला जमिनीत गाडले आणि…

जगभरात सरकार विरोधात अनेक प्रकारे आंदोलन केल्याचे आपण पाहिले असेल. कधी रस्ते अडवून, कधी शांततेत मोर्चा काढून तर कधी गांधीगिरी करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेतले जाते. मात्र इंग्लंडमधील लंकाशायर येथे एका व्यक्तीने एक अजबच उपाय केला.

एरॉन क्रॉस नावाच्या या व्यक्तीने आपल्या तरुण मुलाला जमिनीत गाडून सरकारचे लक्ष वेधले. एरॉन हा आपल्या परिसरात असणाऱ्या खड्ड्यांमुळे त्रस्त होता. त्यामुळे त्याने आपल्या 27 वर्षीय मुलाला जमिनीत गाडले. स्थानिक प्रशासनाला या भागातील खड्डे एवढे खोल आणि धोकादायक आहेत हे पुराव्यासह दाखवण्यासाठी त्याने हा अघोरी उपाय केला.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा खड्डा लंकाशायरमधील वायकॉलर भागात होता. याबाबत 1 वर्षांपूर्वी एरॉस याने स्थानिक प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र तरीही यावर काहीही उपाययोजना करण्यात आली नाही आणि तो खड्डा देखील बुजवण्यात आला नाही. यामुळे एरॉस मेटाकुटीला आला होता.

या खड्ड्यात एखादा अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती, लहान मुलं पडल्यास त्याचा कपाळमोक्ष होणार आणि त्याला बाहेरही पडता येणार नाही एवढा मोठा हा खड्डा असल्याचे एरॉसने सांगितले. त्यामुळे मी माझ्या 6 फूट उंच मुलाला या खड्ड्यात गाडले आणि प्रशासनाला पुरावा म्हणून याचे फोटो पाठवले. तसेच काही ऍक्शन न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील एरॉस याने दिला.

ओबडधोबड रस्त्यामुळे माझी व माझ्या पार्टनरची कार अपघातग्रस्त झाली. हा खड्डा खोल असल्याचा कोणताही बोर्डही येथे लावण्यात आलेला नाही. त्यामुळे हा अनोखा उपाय केल्याचे एरॉस यांनी सांगितले. मात्र यात थोडी जरी चूक झाली असती तर ही गांधीगिरी जीवावर बेतली असती.

आपली प्रतिक्रिया द्या