
आपलं नाक…
श्वास घेण्याच्या क्रियेत आपले नाक महत्त्वाचे कार्य करते. कारण ते हवा मॉइश्चराईज करते. कोरडी हवा गळा आणि फुफ्फुसाला हानी पोहोचवू शकते. पण नाक त्याच हवेला ओलावा देते. आपण नाकाद्वारे श्वास घेतो तेव्हा नाक आलेल्या हवेतील सुक्ष्म जंतू आणि किटाणू नष्ट करतो. नाकाला इजा झाली तर नाकातून रक्त पडते. नाकातून रक्त पडत असल्यास नाकातून रक्त पडणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम मांडी घालून बसवावे. मग सुती रुमाल गार पाण्याने ओला करून नाकावर धरावा. त्याच्या टाळूवर गार पाणी शिंपडावे. त्याचवेळी गार पाणी प्यायलाही द्यावे. नंतर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
नाकातील केस शक्यतो कापू नयेत. कारण हवेतील हानिकारक घटकांपासून नाक आपलं रक्षण करत असतं. नाकामधील केस हवेतील जीवाणू नष्ट करतात. त्यामुळे शक्यतो ते कापू नयेत किंवा तेवढेच कापावेत जे नाकाच्या बाहेर डोकावत असतात. नाक आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करत असते. आपले फुफ्फुस थंड हवा सहन करू शकत नसल्याने आपले नाक हे श्वासाला गरम करण्याचे काम करत असते.

























































