नगर रस्त्यावर फर्निचर कामगाराला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात फर्निचरचे काम करायचे असल्याची बतावणी करत बोलावून घेत दोन चोरट्यांनी राजस्थानी फर्निचर कामगाराला जीवे मारण्याची धमकी देत 62 हजारांना लुटले. ही घटना बुधवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील फॉरेस्ट पार्क रस्त्यावर घडली. अमराराम चौधरी (वय 32, रा. विद्यानगर, वडगाव शेरी) यांनी विमातनळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमराराम मूळचे राजस्थानचे असून ते फर्निचरची कामे करतात. बुधवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एकाने त्यांना घरात फर्निचर बनवून घ्यायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्याठिकाणी दोघांनी मिळून अमराराम यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील मोबाइल, पाच हजारांची रोकड, कानातील सोन्याच्या बाळ्या, पेटीएमवरून 42 हजार 800 रूपये वर्ग करून घेत 62 हजारांची चोरी केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव तपास करीत आहेत.