गडचिरोलीत दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

278

गडचिरोलीतील आरमोरी येथील शिवणी बुर्ज या गावात दिनांक 3 जून रोजी मुंबईहून आलेले पती(वय 50वर्ष) व पत्नी (वय 40 वर्ष) यांचे कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आले. मुंबई येथे पती सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत होते. 3 जून रोजी ते गावात आल्यानंतर त्यांना शाळेत संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. त्यानंतर त्यांना 4 जून रोजी आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात हलविण्यात आले. दिनांक 5 जून रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले.

दिनांक 6 जूनच्या रात्री प्रशासनाकडे त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांना रात्री मुख्यालयातील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या लोकांची माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 43 झाली. तर सध्या अॅक्टिव्ह कोरोना बाधित 17 आहेत. या अगोदर 25 लोकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. एक जण हैदराबाद येथे मृत पावलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या