गडचिरोलीत आज दिवसभरात 11 जणांना कोरोनाची लागण; 14 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळी 7 कोरोना बाधितांनंतर अजून 4 कोरोना बाधित जिल्हयात आढळून आले. तर सकाळी 5 नंतर आता अजून 9 जणांनी कोरोनावर मात केली. नव्याने 4 आढळलेल्या बाधितांमध्ये गडचिरोली येथील विलगीकरणात ठेवलेल्या 2 एसआरपीएफ जवानांचा समावेश आहे. तर मालेवाडा पोलीस कॉलनीतील गृह विलगीकरणातील कर्मचाऱ्याची पत्नी (वय 24 वर्ष) व मुलगी (वय 4 वर्ष) कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यांनी जिल्हयाबाहेर प्रवास केला होता. याबाबत संबंधित रूग्णांच्या संपर्कातील माहिती घेणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

आज सकाळी 5 कोरोनामुक्तीनंतर पून्हा 9 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये गडचिरोली 6, सिरोंचा 2 व अहेरी येथील एका रूग्णाचा समावेश आहे. या नवीन कोरोनामुक्त व बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या 180 झाली. तर एकूण रूग्णांची संख्या 354 झाली. आत्तापर्यंत 173 रूग्ण बरे झाले तर 1 मृत्यू आहे.