गडचिरोली जिल्ह्यात ध्वजवंदन उत्साहात साजरे

440

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त -आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात ध्वजवंदन उत्साहात पार पडले. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात कोरोना काळात उत्तम कामगिरी करत संसर्ग रोखण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या आरोग्य आणि पोलिस सेवेतील कोरोना योद्ध्यांचा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी केलेल्या आपल्या संबोधनातून आरोग्य राज्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्लक्षित घटक राहिलेल्या सर्व विभागांचा एक अहवाल तयार करण्यात येणार असून त्यानुसार या जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार असल्याची माहिती दिली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

कालच भामरागड तालुक्यातील कोठी येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाला त्यांनी श्रध्दांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन-प्रशासन सहभागी असल्याचे म्हटले. आगामी काळात कोरोना चा संसर्ग रोखण्यात यंत्रणा यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या