गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसात चकमक, मोठा शस्त्रसाठा जप्त

776

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. एटापल्ली तालुक्यातील गट्टा- कोठी मार्गावरील येलदळमीच्या पहाडीवर नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची चकमक झाली. या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षल्यांची घेराबंदी केली. परंतु ते पळून जाण्यास यशस्वी ठरले. पोलिसांना घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा मिळाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांना जाळ्यात अडकवण्यासाठी नक्षलवाद्यांनी सापळा रचला होता. नक्षलवाद्यांच्या सापळ्यात पोलीस अडकले होते, मात्र ‘सी-60’च्या जवानांनी प्रतिकार करत नक्षलवाद्यांचा सापळा उधळून लावला आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या गोळीबारानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस त्यांच्या मागावरून शोधमोहीम सुरू आहे. छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या येलदळमीच्या पहाडीवर ही चकमक उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या