
गडचिरोलीत हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. आरमोरी शहरातील भगतसिंग चौकात शुक्रवारी सायंकाळी हिरो टू व्हीलर वाहनांच्या शोरुमची इमारत कोसळली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्नीशमन दल, बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारत कोसळल्याने सहा कामगार ढिगाऱ्याखाली दबले होते. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी आहेत. आकाश बुराडे, केतू शेख आणि अशपाक शेख अशी मयत कामगारांची नावे आहेत. दीपक अशोक मेश्राम, विलास कवडू मने आणि सौरभ रवींद्र चौधरी अशी जखमींची नावे आहेत.