गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींचा चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींचा आता चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. सावली तालुक्यातील हरंबा या वैनगंगा नदीकाठच्या गावात हत्तीने धुमाकूळ घातला आहे. गेले दोन दिवस हत्तीने ग्रामस्थांना दर्शन दिले आहे. गावाच्या बाजारातून थेट शेत शिवारात जात हत्तीने धान पिकाचे नुकसान केले. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या लाकडी नावेची व शेतकऱ्यांच्या स्प्रे पंपाची हत्तीने मोडतोड केली. दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाला पाचारण केले. वनविभागाने पंचनामा करत हत्तीच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. शेतकऱ्यांनी हत्तीने केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.