गायमुख ते फाऊंटन दुरुस्तीचे काम, घोडबंदरवर आजपासून तीन दिवस अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’

घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका रस्त्याच्या मास्टिंगचे काम पूर्ण करणार असल्याने उद्या शुक्रवार १२ डिसेंबर ते रविवार १४ डिसेंबर या कालावधीत घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’ लागू करण्यात आली आहे. दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे येथून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वाय जंक्शन कापूरबावडी येथे प्रवेश बंद. मुंब्रा, कळवा येथून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद. नाशिककडून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद. मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, नाशिक येथून येणारी सर्व अवजड वाहने भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

हलक्या वाहनांना दिलासा

ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या-येणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीपासून फाऊंटन हॉटेलपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.