
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
अंगारकी संकष्टी निमित्त आज गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. पहाटे साडेतीन वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सकाळ पासूनच मंदिराच्या आवारात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अंगारकी संकष्टी निमित्त मंदिराच्या आवारात जत्रा भरली होती. तसेच भाविकांसाठी मोफत खिचडी वाटप करण्यात आले. गणपतीपुळे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






























































