
गोव्यात थिएटर करून मुंबईत करीअर करण्यासाठी आलेला अभिनेता अशोक फळदेसाई…
एक प्रॉमिसिंग चेहरा.
सध्या कलर्स मराठीवर ‘कस्तुरी’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘जीव झाला येडापिसा’मधील ‘शिवा’ अर्थात अशोक फळदेसाई आहे. तो ‘कस्तुरी’मधील ‘समर कुबेर’ ही प्रमुख भूमिका करत आहे. अशोक मूळचा गोव्याचा असून त्याचे ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण गोव्यातच झाले. गोव्यात असताना ‘हंस थिएटर’ या ग्रुपशी तो जोडला गेला. विजयकुमार नाईक हे त्याचे गोव्यामधील गुरू आहेत. सुरुवातीला या ग्रुपतर्फे सादर झालेल्या ‘पाणी’, ‘मुखवटे’ या मूकनाटय़ांत त्याने काम केले होते. मग संस्थेतर्फे राज्य नाटय़ स्पर्धा, एकांकिका यात तो सातत्याने सहभागी होत होता. नाटकाची आवड त्याला या क्षेत्रात करीअर करण्यासाठी खुणावत होती. मग त्याला पुणे येथील ललित कला केंद्राविषयी कळले. ग्रॅज्युएशननंतर पुण्याला येऊन त्याने ललित कला केंद्रातून मास्टर्स पूर्ण केले. तिथे त्याला डॉक्टर प्रवीण भोळे व सतीश आळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबईत करीअर करण्यासाठी तो आला आणि त्याचे स्ट्रगल सुरू झाले. काही मालिकांत त्याने भूमिका केल्या. त्याच्या जीवनात टार्ंनग पॉइंट आला ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेमुळे. त्यातील ‘शिवा’ या व्यक्तिरेखेने तो घराघरांत पोहोचला. त्याच्या चेहऱयाला ओळख मिळाली. त्यानंतर स्टार प्लसवरील ‘मेहेंदी हैं रचनेवाली’मधील ‘मंदार देशमुख’ ही व्यक्तिरेखा त्याने साकारली.
अशोक म्हणतो, ‘‘या साऱया मालिका केल्यानंतर मला ग्रामीण बाजाच्याच भूमिका विचारल्या जाऊ लागल्या, पण मला एकाच ‘इमेज’मध्ये अडकायचे नव्हते म्हणून मी काही भूमिका नाकारल्या आणि माझ्या सुदैवाने ‘कस्तुरी’मधील एक अतिशय वेगळी भूमिका मला मिळाली. यात मी ‘समर कुबेर’ ही भूमिका करत आहे. समर हा राजकारण खेळणारा आहे. त्याच्या घरी सगळे विविध व्यवसायांत आघाडीवर आहेत, पण त्याला बिझनेसमध्ये आवड नसून राजकारणात आहे. त्याचे आपल्या कुटुंबीयांवर प्रेम आहे आणि याच वाटेवर त्याच्या आयुष्यात ‘कस्तुरी’ येते. पूर्ण वेगळय़ा पद्धतीची ही भूमिका आहे.’’ अशोक हा राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल
चॅम्पियन असून त्याला त्यात सुवर्ण पदकदेखील मिळाले आहे. अशोक म्हणतो, ‘‘अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याने आपला या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. नवनवीन भूमिका करताना त्यातील वैविध्य जपणे हे आव्हान पेलायला मला निश्चितच आवडते.’’
गणेश आचवल




























































