बाप्पा, तूच पाऊस घेऊन ये… गणेशभक्तांचे साकडे ये….

मंगळवार, 19 रोजी शहरासह जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणरायाचे आगमन झाले. ढोल-ताशांसह ढोलपथकांच्या आणि डीजेच्या वणढणाटात गुलालाची उधळण करीत भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा गजर करत बाप्पाचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत केले. यावेळी गल्लीपासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत वाजत गाजत मिरवणुकीद्वारे सार्वजनिक मंडळांत तसेच घरगुती गणपतीची भक्तिभावे प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘बाप्पा तूच पाऊस घेऊन ये असे साकडे गणेशभक्तांनी यावेळी घातले.

बाप्पाच्या आगमनाच्या आधी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकयांसह सर्वांनाच चिंता लागलेली आहे. पावसाअभावी पिकासह पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे. परंतु, गणरायाचे आगमन चैतन्यदायी असल्याने गणेशाच्या काळात भरपूर पाऊस होईल, अशी आशा असल्याने भाविकांनी उत्साही वातावरणात गणरायाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यंदाही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात यावर्षी काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु एक दीन पाऊस बरे झाल्याने काहीसे आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात काही भागांत दमदार तर काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. परंतु तरीही लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळाला.

बाप्पा यंदा चांगला पाऊस पडू दे म्हणत गणरायाला साकडे घालण्यात आले. शहरात सजावटीच्या साहित्यासह मिठाईच्या दुकानामध्येही मोठी गर्दी दिसून आली, मामाचौक ते फुलबाजार, वीर सावरकर चौक, गांधीचमन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनिमंदिर, नूतन वसाहत परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले होते. पूजेचे साहित्य, केळीच्या पानाची आज मोठी विक्री झाली. परंतु केळीची पाने, हरळी पाच फळे आंब्याच्या पानाना अपेक्षित भाव मिळाला नाही. केळीपानाचे पाच खांद 40 ते 50 रुपये तर हरळी, पानांची जुडी 10 रुपये, पाच फळे 20 रुपयांना विकली गेली. घरगुती गणपती मूर्तीचे दरही 101 रूपयांपासून 1100 रुपये व त्यापुढे होते. दरम्यान उत्सवादरम्यान कुठेही कुठलाही अनुचित प्रकार पडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी
बंदोबस्त तैनात केल्याचे दिसून आले.

बाप्पा मोरयाचा रुमाल बांधून एकत्र जमण्यास सुरुवात

लाडक्या गणरायाच्या आगमनाची वाट पाहणान्या केली. सकाळी नऊ वाजेपासून रस्त्यावर गुलालाची भक्तांनी आज सकाळपासूनच गणेश स्थापनेची लगबग उधळण ढोल-ताशा, लेझीम आवाज, डीजेच्या बाप्पा यंदा चांगला पाऊस पडू दे. तसेच शहरातील प्रार्थनास्थळावरही कडेकोट सुरु केली होती. सकाळीच लहान मुलांनी डोक्याला ठेक्यावर गणरायाचे आगमन झाले.

जयभवानी गणेश मंडळाच्या मिरवणुकीने वेधले मंठेकरांचे लक्ष

मागील 35 प्रदीप बोराडे, नितीन राठोड, जे. के. कुरेशी, वर्षांची परंपरा असलेल्या मंठा येथील अरुण वानमारे, विकास सूर्यवंशी, राजेश जयभवानी गणेश मंडळाच्या भव्य खंदारे, उबेद बागवान, बाजखान पठाण मिरवणुकीने मठेकरांचे लक्ष वेधले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाजार समितीने सभापती राठोड, मधुकर काकडे, हरिभाऊ चव्हाण पर. जे.बोराडे यांच्या पुढाकारातून सनई-चौघडा, अॅड. ज्ञानेश्वर जाधव सुरू असलेला गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फ गर्दी केली होती.

सूरसंगमचे सनई-चौघडा वाद्य, बॅन्जो पथक गणरायाची फटाक्यांच्या आतषबाजीत श्री प्रतिष्ठापना बोराडे, भागवत चव्हाण गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना बोराडे, महादेव खरात, गोपी गायकवाड जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, अंकुशराव अवचार, अँड. पंकज बोराडे, अजय अवचार, संतोष वरकड, डॉ. डी. जी. काकडे, औरंगराव खरात, संजय राठोड, बाबाराव जानेर सरकटे, संजय नागरे, वसंतराव राऊत, डॉ. संतोष पवार, संजय बोराडे, बाजीराव आतषबाजीने मोराडे, पप्पू दायमा जयभवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल बोराडे, विजय नानासाहेब बोराडे, दिगंबर विकास घनवट, नीरज सोमाणी, अशोक अवचार, शरद मोरे, दत्ता घुगे यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.