कसईत गणेश विसर्जनाला गालबोट

897

पाच दिवसांच्या बाप्पांचे सर्वत्र जल्लोषात विसर्जन होत असताना कसईत घरगुती गणपतीच्या मिरवणुकीत क्षुल्लक वादानंतर झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला.त्यामुळे विसर्जनाला गालबोट लागले असून या प्रकरणातील आरोपीला कालिक पोलिसांनी अटक केली आहे.

कसईच्या पेल्हार डोंगरपाडा येथे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गणपतींचे विसर्जन सुरू होते. यावेळी नाचगाणे सुरू असताना कृष्णा दळकी क अल्पवयीन आरोपीत बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर दोघांनी एकमेकांचे गळे पकडले. मात्र काही वेळाने दळकी या ठिकाणी निपचित पडलेला पाहून मुलांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या