Ganeshotsav 2025 – शिवसेनेकडून गणेशपूजा साहित्याचे वाटप

गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शिवसेनेच्या वतीने अनेक विभागात पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे पूजा साहित्य किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

युवासेना उपसचिव प्रथमेश वराडकर युवती विभाग अधिकारी अक्षदा सावंतकदम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अंधेरी पूर्वची गणेश मंडळे घरगुती उत्सवासाठी हे किट वाटप करण्यात येईल. यावेळी दीपक गायकवाड, करण जाधव उपस्थित होते.

 

शिवसेना शाखा क्रमांक 206 च्या वतीने शिवडी काळाचौकी विभागात पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहेया उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे उपस्थित होते.

विभागप्रमुख सोमनाथ सांगळे महिला विभाग संघटक मनीषा नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्र. 170, चुनाभट्टी, स्वप्नील म्हात्रे संपर्क संघटक सोनाली म्हात्रे यांच्याकडून गणेश पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी अमित रामचंदानी, आदित्य गिड्डे, उद्धव कुमठेकर, अमित घाग, दिलीप मगर उपस्थित होते.