
अजय जोशी । पाटोदा
‘गणपती बाप्पा मोरया‘च्या जयघोषाने गुरुवारी पाटोदा नगरी दुमदमली. शहरात व तालुक्यात सकाळ पासून श्रींच्या आगमनाची लगबग सुरु होती. सायंकाळी ४ वाजल्या पासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. बाजाराचा दिवस असल्याने गर्दी खूप होती. गणेशोत्सवामुळे बाजार फूलून गेलेला होता.
शहरातील घराघरात श्रींचे 10 दिवसांसाठी् आगमन होते. सकाळपासून नागरिकांनी श्रींची मूर्ती घरी स्थापना करण्यासाठी बाजारात गर्दी केली. पुजेसाठी लागणारे साहित्यांचे स्टॉलही गर्दीने फूलून गेलेले होते. शहरात या वेळी 25 पेक्षा अधिक लहान मोठे सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने श्रींची स्थापना करण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात, हलगीच्या, ताशाच्या तालावर गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलेले होते.






























































