
सामना ऑनलाईन, मुंबई
न्यायालयाचे आदेश आणि पालिकेने निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता केली नसलेल्या मंडळांच्या नाकारलेल्या मंडप परवानग्यांबाबत पुनर्विचार करण्यास पालिका प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. असे असले तरी गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, याबाबत न्यायालयात 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबई पालिकेकडे यावर्षी मंडप परवानगीसाठी 3499 इतके विक्रमी अर्ज आले. मात्र पहिल्यांदाच ऑनलाइन परवानग्या देण्यास सुरुवात केल्यामुळेच निर्माण झालेल्या तांत्रिक घोळामुळे परवानग्या मिळाल्या नसल्याचा आरोप मंडळांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौर बंगल्यावर महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, गणेशोत्सव समन्वय समिती आणि पालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ज्या मंडळांनी अटींची पूर्तता केली नाही त्यांनाच परवानगी नाकारल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. याबाबात 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बैठकीला शिवसेना नेते आणि गणेशोत्सव समितीचे ऍड. लीलाधर डाके, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, गणेशोत्सव समितीचे सेक्रेटरी विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.
ऑफलाइन परवानग्या द्या
मंडपांसाठी न्यायालयाचे आदेश क सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन दल क काहतूक पोलिसांच्या अटी-शर्तींची अंमलबजाकणी करणे गणेशोत्सक मंडळांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या अटींची पूर्तता केलेली नसल्यामुळेच या 281 मंडळांना मंडप परकानगी नाकारल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र यामुळे उत्सवाबाबत मंडळांसमोर प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे पालिकेने या मंडळांना ऑफलाइन परवानग्या द्याव्यात अशी मागणी केल्याचे समन्वय समितीचे सेक्रेटरी विनोद घोसाळकर यांनी सांगितले.
न्यायालयाचे आदेश आणि पालिकेच्या अटी पाळूनच मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जाईल. न्यायालयाच्या आदेशांचा अवमान मंडळांकडून होणार नाही. मात्र ऑनलाइन परवानग्यांच्या घोळात पालिकेने तांत्रिक कारणांसाठी नाकारलेल्या परवानग्यांबाबत स्वतः पुढाकार घेऊन निर्णय घेतला पाहिजे- नरेश दहिबावकर, अध्यक्ष,गणेशोत्सव समन्वय समिती




























































