मौजमजेसाठी पैसे नसल्यामुळे पेट्रोपपंप कर्मचाऱ्य़ांची रोकड लुटली, पोलिसांकडून टोळी जेरबंद

मौजमजा करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पेट्रोपपंप कर्मचाऱ्य़ांची लाखो रुपयांची रोकड लुटणाऱ्य़ां सराईतासह पेट्रोलपंप कामगाराच्या टोळीला पोलिसांई बेड्या घातल्या आहेत. उबेर अन्सार खान, अरबाज नवाब पठाण, तालीम आसमोहमद खान, अजीम उर्फ आंट्या, महंमद हुसेन शेख, प्रजोत कानिफनाथ झांबरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात असलेल्या पेट्रोपपंप व्यवस्थापक 14 जूनला 80 लाख 75 हजार रुपयांची रोकड घेऊन बँकेत जात होते. त्यावेळी कोयत्याच्या धाकाने त्यांच्याकडील रोकड चोरून नेण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत होते. पथकाने सलग तीन दिवस अहोरात्र तपास करून सुमारे 19 किलोमीटर परिसरातील 250 पेक्षा जास्त सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती मिळविली. आरोपींनी दुचाकीची क्रमांक प्लेट काढून ठेवल्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पथकाने न थकता काम करीत आरोपींची माहिती काढून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपी सराईत गुन्हेगार असून मौजमजा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रजोत झांबरे याने सय्यदनगरमधील पंपावरील रोकडची माहिती सराईत उबेर खानला दिली. त्यानुसार आरोपी अरबाज आणि तालीम खान याने 14 जूनला पेट्रोलपंप व्यवस्थापक रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात असताना त्यांचा पाठलाग केला. दुसऱ्य़ां आरोपींनी आजूबाजूला लक्ष ठेवले. त्यानंतर आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटल्याची कबुली दिली.

19 किलोमीटर अंतरातील 250 सीसीटीव्ही तपासले

आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेने 19 किलोमीटर अंतरावरील तब्बल 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यासाठी सलग तीन दिवसरात्र काम करण्यात येत होते. आरोपींनी दुचाकीची नंबरप्लेट काढून ठेवली असतानाही, चाणाक्ष कर्मचाऱ्य़ांच्या नजरेतून चोरी लपली नाही. त्यानंतर तांत्रिक तपासाद्वारे पेट्रोलपंप लुटीच्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या