सामुहिक बलात्काराचा आरोप असलेल्या भाजप आमदाराला क्लीन चीट

748

उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्यावरील बलात्काराच्या आरोपातून पोलिसांनी क्लीन चीट देण्यात आली आहे. आरोपींविरोधात पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे.

या प्रकरणी आमदार त्रिपाठी यांचे तीन मुले आणि तीन पुतणे यांचीही आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे.परंतु पोलिसांनी आमदार त्रिपाठी यांचा पुतण्या संदीप तिवारी याच्यावर बलात्काराचा आरोपी मानून त्याला अटक केली आहे. तसेच आमदार पुत्र नितेश त्रिपाठी यावर मारहाण आणि शिव्या दिल्याचा आरोप मान्य केला आहे.

पोलीस अधीक्षक राम बदन यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 फेब्रुवारी रोजी एका महिलेने आमादार रवींद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह सात जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी सात जणांविरोधात मॅजिस्ट्रेटसमोर लेखी साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात आमदार त्रिपाठीसह पाच लोकांविरोधात पुरावे सापडले नाहीत.

महिलेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. आरोपी संदीप त्रिपाठीला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली असून शिवीगाळचा आरोप असलेल्या नितेशला नोटीस पाठवण्यात आली आहे.

वाराणसी ते मुंबई दरम्यान जाणार्‍या ट्रेनमध्ये संदीपची ओळख एका 40 वर्षीय विधवा महिलेशी झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून संदीपने तिच्यावर बलात्कार केला. तसेच 2017 साली विधानसभा निवडणुकीदरम्यन आमदार त्याची तीन मुले आणि तीन पुतणे यांनीही सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या