मिरजोळेत 12 हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षातून विक्रीसाठी गांजा घेऊन जाणार्‍या एका तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरजोळे बसस्थानकाजवळ अटक केली. त्याच्याकडील 12 हजार रुपये किंमतीचा 1.040 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

शिवा पुजारी नावाचा माणूस अंमली पदार्थ घेऊन मिरजोळे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचला. मिरजोळे बसस्टॉपजवळ एक संशयित रिक्षा थांबवून तपासणी करण्यात आली. शिवलिंगाप्पा मल्लेशी पुजारी (वय 26 रा. क्रांतीनगर झोपडपट्‌टी, रत्नागिरी) याच्याकडे 12 हजार रुपये किंमतीचा 1.040 किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पोलिसांनी रिक्षा जप्त करून त्याला अचक केली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. यापुर्वीही मिरजोळे परिसरातच मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्यात आला होता. त्याचबरोबर सावर्डे येथेही गांजा पकडण्यात आला होता. रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे.