गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण

मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे. गाडी पार्किंगच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने ही तोडफो़ड केली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली आहे.

अभिमन्यू गायकवाड यांचे कल्याण तिसाई चौक परिसरात जरीमरी व्हिजन हे केबलचे कार्यालय आहे. सोमवारी गाडी पार्किंगच्या वादातून काही जण गायकवाड यांच्या कार्यालयात घुसले. कार्यालयाच्या कांचांची व वस्तूंची तोडफोड केली. त्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांना देखील बेदम मारहाण केली. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.