
केंद्राने लॉक डाऊन तीन मेपर्यंत वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य चाकरमान्यांना बसणार आहे. 120 दिवसांपूर्वी गाड्यांची तिकीटे बुक करावी लागत असल्याने असे घडणार आहे. गणपतीसाठी ट्रेन बुकिंगची तारीख जवळ आली असून त्यातच लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढले आहे. त्यामुळे आता ऑनलाईन बुकींगसाठी शिवाय पर्याय नसणार उघड झाले आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील बुकिंग बंद असल्याने नेट बुकिंगवर भार पडल्याने ऑनलाईन बुकिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.
यंदा शनिवार 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गेल्यावर्षी सोमवार 2 सप्टेंबरला गणेशाचे आगमन झाले होते. यंदा तब्बल 12 दिवसआधी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 120 दिवस अगोदर आरक्षण करावे लागणार आहे. केंद्र सरकारने आजच लॉक डाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविल्याने तिकीट खिडक्यांवरून आरक्षण करणाऱ्यांची मोठी पंचायत होणार झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगवरच भर पडण्याची वेळ आली आहे.
आरक्षणाचा तक्ता खालीलप्रमाणे प्रमाणे…
कोकणात गावी गणपतीला दोन दिवस आधी चाकरमान्यांना जावे लागते. परंतू 22 एप्रिल म्हणजे पाच दिवसआधीपासूनच्या आरक्षण तारखांचा स्थिती खालीलप्रमाणे आहे. –
20 एप्रिल सोमवार – 18 ऑगस्ट मंगळवार
21 एप्रिल मंगळवार – 19 ऑगस्ट बुधवार
22 एप्रिल बुधवार – 20 ऑगस्ट गुरुवार
23 एप्रिल गुरुवार – 21 ऑगस्ट शुक्रवार (हरतालिका)
24 एप्रिल शुक्रवार – 22 ऑगस्ट शनिवार (श्री गणेशाचे आगमन)
25 एप्रिल – शनिवार – 23 ऑगस्ट
26 एप्रिल रविवार – 24 ऑगस्ट
27 एप्रिल सोमवार – 25 ऑगस्ट
28 एप्रिल मंगळवारी – 26 ऑगस्ट
29 एप्रिल बुधवार – 27 ऑगस्ट गुरुवार ( गौरी गणपती विसर्जन)
लॉकडाऊनमुळे पीआरएस तिकीट बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगवरच भर दिला जाण्याची शक्यता असल्याने अनेक चाकरमान्यांना तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी प्रवासी बळीराम राणे यांनी केली आहे.

























































