विम्बल्डन : गतविजेत्या मुगुरुझाची विजयी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

आपल्या कारकिर्दीतील तिसऱ्या विम्बल्डन जेतेपदासाठी सज्ज झालेल्या स्पेनच्या गतविजेत्या गारबीन मुगुरुझाने सलामीची लढत सहज जिंकून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली. टेनिसच्या या शिखर स्पर्धेत मुगुरुझाची गाठ इंग्लंडच्या नवख्या नावमी ब्रॉड़ीशी पडली. या लढतीत दोन वेळच्या ग्रँड स्लॅम चॅम्पियन मुगुरुझाने ८८ मिनिटांतच नावमीचा ६-२, ७-५ असा सहज पराभव केला.

२०१५ मध्ये अमेरिकन सेरेना विलियम्सकडून पराभूत होणारी मुगुरुझा आपल्या कारकिर्दीतील तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदासाठी यंदा झुंजणार आहे. तिसरी मानांकित मुगुरुझा दुसऱ्या फेरीत बेल्जियमची ऍलिसन व्हान उयत्वांक आणि स्लोवेनियाची पोलोना हरझॉग यांच्यातील विजयी टेनिसपटूशी झुंजेल.