
घरातील सिलिंडरमधून गॅस लिक झाल्यास घाबरून न जाता काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वात आधी खिडक्या आणि दरवाजे उघडा. जेणेकरून गॅस बाहेर जाईल.
सिलिंडरवरचा रेग्युलेटर ताबडतोब बंद करा. जर शक्य असेल आणि गळती कमी असेल, तर सिलेंडरला हळूच बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जा. तुमच्या गॅस एजन्सीला फोन करा.
लाईटचे स्विच, मोबाईल फोन किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वेळी वापरू नका. कारण त्यामुळे ठिणगी पडून आग लागण्याची दाट शक्यता असते.
साबणाच्या पाण्याचा फेस रेग्युलेटर आणि पाईपच्या जोडांवर लावा. जर बुडबुडे येत असतील तर गळती आहे. वेळ न दवडता गॅसचा स्फोट होणार नाही, याची काळजी घ्या.
अशा वेळी घरात आगपेटी किंवा लायटरचा वापर अजिबात करू नका. स्टोव्हचे नॉब बंद आहेत याची खात्री करा. ताबडतोब परिसर सोडा आणि सुरक्षित ठिकाणी जा.



























































