
बॉलीवूडच्या अभिनेत्र्या म्हंटलं की आपसुक डोळ्यासमोर उभ राहतं ते बोल्ड, ब्युटीफूल, स्लीम ड्रीम सौदर्य. तुम्हाला बॉलीवूडमध्ये टिकायचं असेल तर फिगर मेन्टेन करावी लागते. यासाठी अनेक विवाहित अभिनेत्र्या एकचं मुल जन्माला घालणं पसंत करतात. फिट अॅण्ड फाईन असाल तर कामाची कमतरचा कधीच भासत नाही. मात्र याच सगळ्या कॅटेगरीला अपवाद ठरणारी अभिनेत्री म्हणजे गौहर खान.
टीव्ही मालिका, चित्रपट आणि अनेक रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अभिनेत्री गौहर खान वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकताच तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिचा पती, आई आणि संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गौहरने दुसऱ्यांदा गरोदर असल्याची घोषणा केली होती.
बेबी शॉवरसाठी तिने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये तिचा बेबी बंप देखील दिसत होता. तसेच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील दिसत होता.अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गौहर आणि झैद दरबार यांचे २०२० मध्ये लग्न झाले. झैद हा संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. २०२३ मध्ये हे जोडपे पहिल्यांदाच आई बाबा बनले. गौहरने जीहान नावाच्या मुलाला जन्म दिला. यानंतर आता, २०२५ मध्ये, गौहरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करून दुसऱ्यांदा आई होण्याची बातमी दिली.