तिच्या डोळय़ांच्या तेजापुढे जगातली सारी संपत्ती फिकी

अदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. गौतम अदानी यांनी ‘एक्स’वर आपल्या नातीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आपली 14 महिन्यांची नात कावेरीला उचलून घेतले असून ते तिच्या डोळ्यात बघतायत.

‘तिच्या डोळ्यांच्या तेजापुढे जगातील सारी संपत्ती फिकी…’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली. हा फोटो 21 मार्च रोजी सायन्स म्युझियम, लंडन येथील न्यू अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेण्यात आला होता. कावेरी ही त्यांची धाकटी नात असून ती करण आणि परिधी अदानी यांची तिसरी मुलगी आहे. गौतम अदानी यांनी आतापर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या नातींवरील प्रेमाचा उल्लेख केला आहे. ‘मला माझ्या नातींसोबत वेळ घालवायला आवडतो. यामुळे सर्व तणाव दूर होतो. काम आणि कुटुंब एवढंच माझं जग असून माझ्यासाठी कुटुंब हा शक्तीचा मोठा स्रोत आहे,’ असे म्हटले होते.