‘माँ’ या बिरुदामुळे बदलले विश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मे महिन्याचा दुसरा रविवार जगभरात ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘गुरू माँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱया कोरिओग्राफर आणि सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’ ची परीक्षक गीता कपूर हिने ‘माँ’ या बिरुदामुळे आपले विश्व बदलल्याची भावना व्यक्त केली. आपल्याला ‘माँ’ म्हणून संबोधले जाते याबद्दल गीता कपूर म्हणाली, ‘‘हे आश्चर्यकारक आहे, असे म्हणण्यासाठी मी काय खास केले नाही, जेव्हा स्पर्धक मला ‘गीता माँ’ असे संबोधतात तेव्हा मला जबाबदारी आल्यासारखी वाटते. पण मी कधीच तुम्ही माझे ‘शिष्य’ आहात असे कोणालाही म्हटले नाही. त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की, मी फारसे काही न करताही मला एवढे प्रेम मिळाले आणि माझ्या नावासोबत ‘माँ’ हे बिरुद जोडले गेले, त्याबद्दल मी ऋणी आहे. ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.’’ या वीकएंडला ‘मदर्स डे’च्या निमित्ताने गीता कपूर गुरू-शिष्य परंपरा जपत सगळय़ा स्पर्धकांना आणि कोरिओग्राफर्सना नटराजाची मूर्ती भेट म्हणून देणार आहेत.