घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

घाटकोपरमध्ये सोमवारी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून मुंबई पोलीसांचा गुन्हे विभाग त्याचा शोध घेत होते. मुंबई पोलीस त्याला घेऊन मुंबईला निघाल्याचे समजते.