…तर घाटकोपर दुर्घटना घडलीच नसती!

पुण्यात गेल्या वर्षी पुणे-बंगळुरू महामार्गाजवळील किवळे येथे बेकायदेशीर होर्डिंग पडल्याने पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगची झाडाझडती घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन कागदावरच राहिले. पुण्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन वेळीच कारवाई झाली असती तर घाटकोपरमधील निष्पाप जीवांचा बळी घेणारी ही घटना टाळता आली असती, असा संताप मुंबईकरांनी व्यक्त केला आहे.

कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर 18 एप्रिल 2023 च्या संध्याकाळी वादळी वाऱयामुळे महाकाय अनधिकृत होर्डिंग अंगावर कोसळल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह राज्यभरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करू अशी घोषणा केली. मात्र, वर्ष झाले तरी ना अशा बेकायदेशीर होर्डिंगचे सर्वेक्षण केले गेले ना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची ती घोषणा कागदीच राहिली.

व्यावसायिक, महापालिका कर्मचाऱयांचे साटेलोटे राज्यभरात मोठमोठी होर्डिंग उभी राहत असून केवळ जाहिरातींमधून महसूल वाढावा, यासाठी महापालिका प्रयत्न करताना दिसतात. हे करताना होर्डिंगसाठी दिलेल्या जागेपेक्षा जास्तीच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर होर्डिंग उभारतात. काही वेळा होर्डिंग उभारून नंतर परवानगी घेण्याचे प्रकार घडतात. याला होर्डिंग व्यावसायिक आणि महापालिका कर्मचाऱयांचे सोटेलोटे जबाबदार असल्याचे उघडपणे म्हटले जात आहे.

शिंदे सरकारच जबाबदार

गेल्या अडीच वर्षांपासून राज्य सरकारच्या दबावातून पालिकेचा कारभार चालवला जात आहे. त्यामुळे सोमवारच्या अपघाताला शिंदे सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. सध्या शिंदे-भाजपचे राज्य आहे. 800 कोटींच्या भ्रष्टाचाराला कोणी परवानगी दिली? बेकायदा होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. सध्या भाजप, शिंदे सरकार प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करीत आहेत. त्यामुळे दुर्घटनेलाही तेच जबाबदार असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

चंदा लो धंदा दो’ पद्धतीने महायुतीचा कारभार सुरू

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेवरून काँग्रेसने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. चंदा लो धंदा दो अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरू असल्याने अशा घटना घडत असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, या दुर्घटनेला राज्य सरकार आणि महापालिका जबाबदार आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पापांचा बळी गेला, असा आरोपही त्यांनी केला.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तसेच हार्ंडग्ज धोरणानुसार राज्यातील सर्व हार्ंडग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. दानवे यांनी आज घाटकोपरला दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने 2022 ला होर्डिंग्ज धोरण आणले, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंग्ज धोरणाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. या घटनेला जबाबदार असलेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकाऱयांवर कारवाई करून घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही दानवे यांनी केली.

काँग्रेसकडून भाजपचा पर्दाफाश…

z मोदींना प्रेरणास्थान मानणाऱया अजमेरा ग्रुपच्या अनधिकृत होर्डिंगमुळेच निष्पाप जिवांचे प्राण गेले… ‘इन्स्पिरेशन क्रॅश्ड’ असे काँग्रेसने ‘एक्स’ पोस्टमध्ये नमूद केले आहे.

होर्डिंगबाबत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवरआरोप करणाऱया भाजपचा पोपटलाल किरीट सोमय्या यांना काँग्रेसने उघडे पाडले. घाटकोपरमध्ये 14 जणांचा बळी घेणारे महाकाय होर्डिंग अजमेरा ग्रुपचे होते. आशियातील सर्वात मोठे होर्डिंग म्हणून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाल्याचा काwतुक सोहळा या ग्रुपने साजरा केला होता. विशेष म्हणजे अजमेरा ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कृपाशीर्वाद आहे. केड्राई युथ कॉन्क्लेव्ह 2019 च्या आयोजन समितीत अजमेरा ग्रुपचे धवल अजमेरा यांचा समावेश होता. त्या आयोजनासाठी मोदींनी समितीचा गौरव केला होता. हा फोटो ट्विट करत काँग्रेसने पोलखोल केली.