प्रेमसंबंध नसतानाही गावात झाला बोभाटा, तरुण-तरुणीची आत्महत्या

1799
प्रातिनिधिक

प्रेमसंबंध नसतानाही गावात बोभाटा झाल्याने एका तरुण तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार गेवराईतील जातेगाव येथे घडली आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून बेद्रे सरांनी तिची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. त्या तरुण तरुणीचा मृतदेह जातेगावपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे.

शनिवारी जातेगावहून ही तरुणी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी बाळु विठोबा जाधव (रा. जातेगाव) याच्याविरोधात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासन पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान जातेगावपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीत सर्वप्रथम तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्या तरुणीने विहरीकाठी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. त्यात तिने ‘आई माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो, मात्र शेजारच्या बेद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले’, असे लिहले आहे. त्याच ठिकाणी पोलिसांना तरुणाचे पाकिट व आधार कार्ड देखील सापडले. काही वेळाने पोलिसांना विहरीत तरुणाचा देखील मृतदेह सापडला. तलवाडा पोलीस ठाण्याचे पीएसआय माने, वरकड, सोनवणे, आंधळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या