मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशी संतापले

इंस्टाग्रामवर रिल्स टाकून लाईक्स मिळविण्यासाठी लोकं वाटेल ते करायला तयार होतात. कधी रस्त्यावर, कधी भर मार्केटमध्ये, कधी मेट्रोमध्ये तर कधी रेल्वेत डान्स करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या लोकलमध्ये सध्या एका मुलीचा भोजपुरी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काहींनी तर या मुलीला अटक करण्याची मागणी केली आहे. तर व्हिडीओत ती अशी ती डान्स करत आहे की प्रवासी अस्वस्थ होऊन दुसरीकडे जाताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये, तरुणी चालत्या ट्रेनमध्ये भोजपुरी गाण्यांवर डान्स करताना दिसते. यादरम्यान, ती अशा हालचाली दाखवते की जवळ बसलेले काही प्रवासी अस्वस्थ होतात आणि दुसरीकडे जातात. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप पाहून लोक तरुणीवर आता टीका करत आहेत. काहींनी तिचा डान्स अश्लील असल्याचे म्हटले आणि सार्वजनिक वाहतुकीत असे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांना केले.

@mumbaimatterz ने X वर व्हिडीओ शेअर करत लिहीले आहे की, या तरुणीला मुंबई लोकलमध्ये आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या आत भोजपूरी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सोबत जीआरपी मुंबई, डीआरएम आणि रेल्वेला टॅग करत अशा प्रकारच्या गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मुंबई सेंट्रल डीआरएमच्या अधिकृत हँडलवरून या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनीषा डान्सर असे या तरुणीचे नाव असून तिने काही वेळापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये असाच डान्स केला होता.

एका युजरने लिहीले की, ही एकटीच मुलगी आहे जी सगळ्या ठिकाणी अशाप्रकारचे उपद्रव करत आहे. हिला आधी वॉर्निंग देत सोडले होते. मात्र आता तिला अटक करुन मुबंईच्या बाहेर सोडले पाहिजे. तर दुसऱ्या युजरने म्हंटले आहे की, लोकं तिला पाहण्यासाठी फॉलो करतात, त्यामुळे ती असे करते. माहित नाही आपण कोणत्या समाजात जगत आहोत, जे अशाप्रकराच्या गोष्टींना प्रोत्साहन देतात.